शिवसेनेबरोबर युती केली हेच चुकले: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

शिवसेनेबरोबर युती केली हेच चुकले: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Pckhabar-विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती केली हीच चूक झाली अन्याय भाजपाला १५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते होते. भाऊ तोरसेकरांनी जी राजकीयं भाकितं केली होती त्याचा आधार घेऊन फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.

फडणवीस काय म्हणाले, भाऊ तोरसेकर यांनी २०१३ मध्ये सांगितलं होतं की भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर संपूर्ण बहुमत २७२+ जागा भाजपाला मिळतील. त्यावेळी भाऊ तोरसेकर अशक्य वाटणारा अंदाज बांधत आहेत असं अनेकांना वाटलं. मात्र त्यांचं ते भाकित खरं ठरलं. २०१९ मध्येही काहिशी अस्थिरता होती. त्यावेळीही भाऊ म्हणाले होते की ३००+ जागा येतील. लोकसभा निवडणुकीत तेच घडलं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी एक पुस्तक लिहून भाजपाला पर्याय दिले होते. भाजपा १५० पेक्षा अधिक किंवा युती २०० पेक्षा अधिक त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय निवडला नसता तर तोरसेकर यांचे तिसरे भाकित खरे ठरलं असतं. आपण मोदींच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात १५०+ जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली, असे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *