पिंपरीत आज 843 नवीन रुग्णांची नोंद,862 जणांना डिस्चार्ज, 21 मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 843 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 68 हजार 439 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 862 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील 14 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये भोसरी, देहूरोड, काळेवाडी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, निगडी,
सांगवी, मावळ, येरवडा, खेड, भूम, रायगड, जुन्नर येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
शहरात आजपर्यंत 68 हजार 439 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 54 हजार 225 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1109 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 335 अशा 1444 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5522 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.










Leave a Reply