आयुर्वेदाकडे वाटचाल काळाची गरज…!

आयुर्वेदाकडे वाटचाल काळाची गरज…!
 धिरज विजयकुमार भोसले (आयुर्वेद महाविद्यालय, राहुरी )

Pckhabar- आयुर्वेद शास्त्र हे नित्य आणि शाश्वत शास्त्र आहे. म्हणून तर अनंत अडचणींवर मात करून आजही दिमाखात टिकून आहे. व उद्याही असेलच यात तिळमात्र शंका नाही आयुर्वेदाला खूप वर्षापासून सुरू असलेली व्यापक व उत्तुंग परंपरा आहे भारताच्या प्राचीन वैद्यकीय ज्ञानाची कल्पना देते.

मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे वर्णन केलेले आहे.
आयुर्वेदात मूलतः दैवी व मानवी अशा दोन तत्वपरंपरा आहेत . मानुषी परंपरेत चरक संहिता सुश्रुत संहिता काश्यप संहिता आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सा याची सुद्धा परंपरा आहे तिची सुरुवात महर्षि सुश्रुत यांनी केली होती.

हिताहितं सुखं दुःख मायुस्तस्य हिताहितम |
मानचं तच्च यत्रोक्तं मायुर्वेद:स उच्चते ||
( चरक पूर्वार्ध) 

आयुष्याकरिता हितकारक, अहितकारक, सुखकारक, दुःखकारक अशा बाबींचे वर्णन तसेच श्रेष्ठ आयुष्य व आयुष्याचे प्रमाण व त्याचे लक्षण ज्या शास्त्रात वर्णन केले आहे ते ‘आयुर्वेदशास्त्र’ होय.

स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकून ठेवणे आणि व्याधिग्रस्त अशा रोगी व्यक्तींना निरोगी करणे हे आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे. बहुदा मनुष्य आजारी पडूच नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेणारी एकमेव व जगातील शास्त्र असेल असे मला वाटते.

मला तर वाटते भारतातील आरोग्याची संपूर्ण जबाबदारी आयुर्वेदावर होती.
भविष्यात जागतिक स्वास्थ्याची जबाबदारी आयुर्वेदावर असेल. या दोन्ही विधानांवर फार थोड्या लोकांचा विश्वास बसेल अगोदरच या आपल्या शास्त्रा बद्दलचा आदर संपला. आणि नंतर विश्वास भारतीय शास्त्रांची यामुळेच अधोगती झाली. आयुर्वेद याचा आयुर्वेदा योग याचा योगा झाल्यापासूनच अनेकांना आयुर्वेद सोनेरी वाटू लागला आहे. अर्थात ही वाढ आहे, सूज आहे की फुगवटा याचा ऊहापोह महत्त्वाचा वाटतो.

आयुर्वेद हा जगायचे नियम शिकवतो .
सदवृत्त नावाची अतिशय उत्तम संकल्पना आयुर्वेदात आहे. कोणी कोणाशी कोणत्या जागी आणि कसे वागावे. असे नियम स्वास्थ्य खूप लहान आहे. त्यात खरंतर दुर्लक्षित आहेत, कायम सर्दी येते ,ताप येतो, हवा बदलली की आजारी पडते, कंबर दुखते, डोके दुखत , मान दुखते, पित्त होते, पोटाला फोड येतात, सारखे लघवीला जावे लागते , झोप लागत नाही , पाळी वेळेवर येत नाही, अंगावरून कमी जास्त जाते , जेवावे वाटत नाही ,भूक लागतं नाही पोट साफ होत नाही…!

शरीर व्यक्त करत असते पण त्याच्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नसतो. कारण मन शांत आणि स्थिर नसते. मन शांत व स्थिर करण्यासाठी जेवढ्या अध्यात्माच्या गोष्टी करतात. आणि समाधान प्राप्त करतात. तेवढ्याच आयुर्वेद शिकणाऱ्यास उत्तम दर्जाची अध्यात्मिक बैठक आयुर्वेदात मिळू शकते.

एकविसाव्या शतकात जगत असताना सर्वांची शरीरे ही रासायनिक संक्रमणाच्या अधीन होऊन सर्व गोष्टी या शरीरास घातक ठरू शकतात. रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आयुर्वेद हा एकच पर्याय आज आहे सद्य परिस्थितीला सर्वात जास्त जुनाट आणि घातक समजले जाणारे सर्व मधुमेह, उच्च रक्तदाब या सर्व प्रकारच्या आजारांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी औषध आयुर्वेद शास्त्र शिवाय अन्य शास्त्र बनवू शकले नाही. सध्या आयुर्वेदाची अवस्था ही

कशास भाषा व्यक्त व्यर्थ बोलता,
एकविसाव्या शतकाची,
एकविसावा ही न दिसावा
व्यथा आमुच्या आयुष्याची…!

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रसायन, वाजीकरण याची सुविधा आहे. पंचकर्मा सारखे दैवी देणगी स्वरुप आयुर्वेदात आहे. शरीरात साचलेले सर्व प्रकारचे दोष पंचकर्माच्या साह्याने दूर करून उत्तम आरोग्य आपण उपभोगु शकू.

आयुर्वेदामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये प्रातः कालापासून रात्री झोपेपर्यंत सर्व विधी ही दिनचर्या अध्यायातून आणि ऋतू चर्या मधून संबंधित ऋतूमध्ये काय करावे याचे सुस्पष्ट वर्णन केलेले आहे. दिनचर्या ऋतुचर्या जर काटेकोरपणे पाळल्या तर ‘आरोग्यम धनसंपदा’ ही उक्ती नक्कीच सार्थकी लागेल.

सध्या जगभर पसरत असलेली कोरोना महामारी यामध्ये प्रकर्षाने अभ्यास केला असता, आजारांमध्ये सर्वोत्तम गुणकारी औषध आयुर्वेदिकच करू शकते.
आजीबाईंचा बटवा किंवा जडीबुटी एवढा संकुचित क्षेत्र आयुर्वेदाचं नसून ते विकृत विलक्षण मोठे आहेत.

येणाऱ्या काळामध्ये आपल्या समस्या ह्या गर्भावस्थेपासून सुरू होणाऱ्या असतील.
गर्भसंस्कार हे आयुर्वेदिक संस्कार केल्यानंतर नऊ महिने त्या गर्भावस्थेतील बाळाची योग्य वाढ व निरोगीपणा आयुर्वेद देऊ शकते.

‘सुवर्णप्राशन’ सारखे नामधारी व गुणक औषध बालकांच्या पोषणास उपयुक्त आहे. आयुर्वेदाला चांगले दिवस तेव्हाच येते जेव्हा तो सिद्धांतासहित स्वीकारला जाईल.

आयुर्वेदाचे पंचकर्म मधील पाच प्रमुख कारणे.

१) वमन- मुखावाटे दोष बाहेर काढणे.
२) विरेचन – अधोमार्गाने दोष बाहेर काढणे.
३) बस्ती – दोषांचे निर्हरण करण्यासाठी गुदद्वारा मार्गे औषधी देणे.
४) नस्य – मानेच्या वरील दोषांसाठी नाकाद्वारे औषधे
५) रक्तमोक्षण – अशुद्ध रक्त शरीरातून बाहेर काढणे

या पाच पंचकर्माचा अवलंब त्या-त्या ऋतुनुसार योग्य पद्धतीने जर केला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मनुष्य आजारी पडणारच नाही.
सर्व आजारांपासून आराम पाहिजे असेल तर, नक्कीच आयुर्वेद अंगीकरने ही काळाची गरज आहे.

(टिप-‘युथ क्लब ऑफ’ देहुगाव यांच्या वतीने गणेशत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळालेला हा निबंध आहे.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *