निबंध स्पर्धेत धीरज भोसले, आयुष गाडे, सायली पवार, प्रेरणा उढाण विजेते

निबंध स्पर्धेत धीरज भोसले, आयुष गाडे,
सायली पवार, प्रेरणा उढाण विजेते
Pckhabar- ‘युथ क्लब ऑफ’ देहुगाव यांच्या वतीने गणेशत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निबंध स्पर्धा विविध विषयांवर घेण्यात आली होती. दोन गटात ही स्पर्धा झाली. मोठ्या गटात  उस्मानाबाद येथील धीरज विजयकुमार भोसले याने प्रथम, येलवाडी येथील आयुष अंकुश गाडे द्वितीय, देहूगाव येथील कु. सायली नारायण पवार आणि प्रेरणा पाराजी उढाण यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. तर लहान गटात चिखली येथील प्रेरणा विनायक पोंदकुले प्रथम तर व्दितीय दिव्या प्रविण कोलते यांना जाहीर करण्यात आला आहे.

कु. सायली नारायण पवार हिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाचे वाढते महत्त्व लक्षात घेता ‘आयुर्वेदाकडे वाटचाल काळाची गरज’ या विषयावर भाष्य करणारा सुंदर असा निबंध लिहिला होता.

सर्व विजेत्यांना ‘युथ क्लब ऑफ’ देहूगाव तर्फे प्रमाणपत्र, पुस्तक भेट देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *