Mumbai News :पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार-गृहमंत्री

पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार-गृहमंत्री
Pckhabar- राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची  माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पण ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला योग्य तो न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.  सरकार पुढील दोन दिवसात मराठा आरक्षणाचा मसुदा घटनापीठासमोर सादर करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *