‘बुलेटराजा’ गजाआड; 14 महागड्या दुचाकी जप्त

 ‘बुलेटराजा’ गजाआड; 14 महागड्या दुचाकी जप्त
Pckhabar- ‘बुलेट राजा’ म्हणून नाशिक भागात ओळखला जाणारा सराईत वाहनचोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 10 बुलेट आणि अन्य 4 अशा एकूण 17 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 14 महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
हेमंत राजेंद्र भदाने (वय 24, रा. भोरवाडा, सातपुर, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, भोसरी येथुन के.टी.एम. मोटार सायकल चोरी केलेला एक चोर भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाचे समोर येणार आहे. पोलिसांनी दोन पथके तयार करून सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हेमंत पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड व पुणे परीसरातुन बुलेट, एफ झेड, के टी एम, पल्सर अशा महागड्या मोटार सायकली चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे या भागातील नागरीकांना कागदपत्रे नंतर देतो असे सांगुन विकल्याचे समोर आले.
पोलिसांनी धुळे, बीड, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर मधून 10 बुलेट, 2 एफ झेड, 1 के.टी.एम व 1 पल्सर अशा 17 लाख 70 हजार रुपये किमतीची एकुण 14 दुचाकी जप्त केल्या. तसेच त्याच्या साथीदार (योगेश सुनील भामरे, वय 24, रा. धुळे) यालाही  पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *