‘व्यवसायाची क्षितिजे’ या विषयावर परिसंवाद
Pckhabar- शून्यातून विश्व उभारणाऱ्या लायन ओमप्रकाश पेठे यांचे ‘व्यवसायाची क्षितिजे’ या विषयावर परिसंवादाचे शनिवारी ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी 3 ते 4 या वेळेत परिसंवादाचे आयोजन केले आहे.
नोकरी व व्यवसायातील मूलभूत फरक, कौशल्य, सरकारी धोरण, कागदपत्रे, भांडवल उभारणी, अपयशाची भिती अशा अनेक कारणांनी व्यवसायाकडे बघण्याच्या सामाजिक दृष्टिकोनात बदल होण्याची गरज ओळखून शून्यातून विश्व उभारणाऱ्या लायन ओमप्रकाश पेठे यांचे मार्गदर्शन नवीन पिढीला स्फूर्तिदायी ठरावे म्हणून या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवादात सहभागी होण्यासाठी Google Meet Link: https://meet.google.com/rqx-eifp-qxv या लिंकवर क्लिक करून भाग घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ पुना निगडीचे अध्यक्ष लायन मारुती मुसमाडे, कौशल्य विकास प्रकल्प प्रमुख एम जे एफ लायन अशोक येवले यांनी केले आहे.










Leave a Reply