‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’
डॉ. अंकुश जाधव

नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली) 

Pckhabar-
मन….एक अवयव
डोळ्यांना न दिसणारा मन….
एक फुलपाखरू…
हाती न येता नुसतंच रंगवून जाणारं
मन….एक यंत्र…कधी भूतकाळ तर कधी भविष्यात नेणार…
मन आज ही एक न समजणार कोड आहे….
चार लॉकडाउन व चार अनलॉक कोरोनाच्या महासाथी मुळे लोकांना माहीत झाले. या काळात लोकांच्या मध्ये ताण-तणाव, चिंता, भीती, नैराश्य इ.सारख्या मानसिक आजारांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली.”युअर दोस्त” नावाच्या संस्थेने केलेल्या पाहणी अहवालानुसार स्त्रियात४१.१ टक्के तर पुरुषांत ५६.९टक्के तणावाचे प्रमाण दिसून आले. विविध शहरातील लोक, गृहिणी, विध्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक इ.मध्ये मोठया प्रमाणात तणावाचे प्रमाण दिसून आले. नोकरदारात ३४टक्के रंगाचे तर भीती, चिंता, नैराश्य, आत्महत्याचे विचार यांचे प्रमाण ४१टक्के दिसून आले.

आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे तर ते आहे शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य. शारीरिक आजारांचा मनावर व मानसिक आजारांचा शरीरावर परिणाम होत असतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ७०टक्के लोकांना औषधांची गरजच नसते. २५ टक्के आजार साध्या घरगुती उपचारांनी बरे होतात तर केवळ ५ टक्के आजारांसाठी अत्याधुनिक तपासण्या व उपचारांची आवश्यकता असते. वरील ७० टक्के आजारांपैकी ४० टक्के आजार हे मानसिक ताण-तणाव, नैराश्य, भीती, चिंता इत्यादींचा शरीरावर परीणाम होऊन होतात.

यालाच”सायकोसोमटीक” आजार असे म्हणतात. यात व्यक्तीमध्ये खरोखरच आजाराची लक्षणे दिसतात.परंतू तपासण्या केल्या असता त्या “नॉर्मल” येतात. ताण-तणाव, भीती, नैराश्य, चिंता, दडपण इ.नी मनाला, बुद्धीला ताण देणाऱ्या समस्यांचा परीणाम मज्जासंस्था व रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. परिणामी शरीरात आवश्यक ते पेक्षा जास्त अंतद्रव्यें (enzyame) व संप्रेरके, (Hormons) यांची निर्मिती होते. त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती, श्वसन संस्था, त्वचा, पचन संस्था इ.वर होऊन सर्दी, कोरडा खोकला, आम्लपित्त, आव पडणे, डोकेदुखी, अंगदुखी, दमा, त्वचेचे विविधआजार इ.आजार होतात. परंतु या रोगांच्या तपासण्या केल्या असता त्यात काही ही आढळून येत नाही.

मनाचे १)अंतर्मन व २)बाह्यमन असे दोन प्रकार असतात. अंतर्मन हे बाह्य मनापेक्षा खूपच जास्त शक्तीशाली, प्रभावशाली असते. दोन्ही मने एकमेकांना जोडलेली असतात. बाह्यमनाने अंतर्मनला सूचना वा विचार दिला तर त्याची परिपूर्णता करण्यासाठी अंतर्मन प्रयत्नांची पराकाष्ठा करते. तुमचे बाह्यमन ज्या प्रकारचे विचार अंतर्मन देते त्याप्रमाणे ते अंमलात आणते.

गेल्या ६/७महिन्याच्या कोरोना काळात सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याने त्याचा परिमाण माणसाच्या शरीर व मनावर झाला आहे. परंतु आलेल्या या परिस्थितिशी सामना करणे ही आवश्यक आहे.मानस शास्त्रात “बदलत्या परिस्थितीत ही स्वतःला कसे योग्य प्रकारे ठेवता येईल, कसे टिकून राहता येईल”या बद्दलची एक संकल्पना आहे तिलाच”फ्लुईड इंटेलिजन्स” असे म्हणतात. आजच्या स्थितीत या संकल्पनेचा वापर करून घेणे आवश्यक आहे.
ज्यांच्या वर मानसिक परिणाम झाला आहे. त्यांच्याशी आपुलकीने,प्रेमाने बोलण्याची आवश्यकता असते. कारण हे आजार त्यांच्या मन व बुद्धीवर पडलेल्या ताणा मुळे झालेले असतात.
या आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. घाबरून जाण्यात अर्थ नाही. नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करा. आपले काय होईल याचा विचार, चिंता करण्यापेक्षा आपला उध्याचा दिवस कसा चांगला जाईल याचा विचार करा. त्या दृष्टीने नियोजन करा. योग्य आहार,योग्य व्यायाम करा, शांत झोप घ्या. चांगला छंद लावून घ्या. बातम्या सोडून टी. वी.चांगले कार्यक्रम पहा, चांगली पुस्तके वाचा, कोणत्याही मीडिया वरील भीतीदायक, नकारात्मक कार्यक्रम बघू नका व या अर्थाचे संदेश कोणाला पाठवू नका, चांगल्या मित्रांशी बोला, नेहमी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण मन व बुद्धीला ताण देणाऱ्या गोष्टी घडल्या तर त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती व पंचांसंस्थेवर होतो. आपण जसा विचार करतो तसे तरंग मेंदूत उमटत असतात.

“तुमचे विचार तुमचे भविष्य असते. तुमच्या विचारांची निवड हे तुमचे भाग्य असते”असे जगातील सर्वच विचारवंतांनी सांगितले आहे. याची वारंवार जाणीव ठेवा. आताचा फारसा विचार न करता असे स्वप्न रंगवा की, भविष्यात भरपूर आनंद व सुख मिळेल. कारण माणूस स्वप्नावरच जगत असतो.

आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्या ची स्वतःलाच घ्यायची आहे. आपल्याला स्वतःलाच घडायचे आहे. दुसरा कोणी घडविणार नाही. म्हणून आनंदी, सुखी राहा, वारंवार कोरोनाचा विचार करणे सोडून द्या. सकारात्मक गोष्टी पहा, करा. संयम व मनोधैर्य कायम राखा. या सर्वांनी तुमची शारीरिक व मानसिक रोगप्रतिकारक शक्ती वाढून केवळ कोरोनाच नव्हे तर कोणत्याही आजारापासून रक्षण मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *