केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
Pckhabar- केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे.
‘काल थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणी दरम्यान माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे. तसेच माझी तब्येत ठीक असून आपल्या सर्वांच्या प्रार्थना माझ्यासोबत असून मी स्वत :ला आयसोलेट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.










Leave a Reply