देहूगाव परिसरात कोरोना रुग्ण संख्या सहाशे पार!
Pckhabar -देहूगाव परिसरात कोरोना रुग्ण संख्येने सहाशेचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी सात नवे रूग्णांची नोंद झाली आहे.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 602 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 506 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
85 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. 23 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे. तर तीर्थक्षेत्र देहूगावच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 39 रुग्ण उपचार घेत आहेत.










Leave a Reply