सफाई कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रिपाईचे आंदोलन

सफाई कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यासाठी रिपाइंचे आंदोलन
Pckhabar- ठेकेदारी पध्दतीने सेवेत असलेल्या सफाई कर्मचार्‍यांना  कायमस्वरुपी करण्यात यावे, सेवक वर्गास दर महिन्याचे वेतन दिले जावे यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयासमोर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.              
कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या या कामगारांचे कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणावर शोषण केले जात असल्याने त्याविरोधात हे आंदोलन केल्याचे रिपाईंचे पुणे शहर कार्यकर्ते संजय कांबळे यांनी सांगितले.
विशेषतः कोरोनाच्या संकटात परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वाचे काम करणार्‍या या कामगारांना गेल्या तीन महिन्यात पगार मिळालेला नाही. त्यामुळे हा पगार मिळावा यासह विविध मागण्यांचे निवेदन सहायक आयुक्तांना देण्यात आले. कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडात कंत्राटदार घोटाळा करत असून त्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा. सफाई कामगारांना मनपाच्या वतीने आरोग्यविषयक वस्तू मिळाव्यात, कामगारांना प्रती महिना पगार वेळेत मिळावा, कंत्राटी पधध्दतीने काम करणार्‍या सफाई कामगारांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. रिपाईंचे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात सफाई कामगारांसह सोनूताई खुडे-वर्मा, हलीमा शेख, अमोल खंडाळे, बाळासाहेब पाटोळे,  रिपाई सदस्य गणेश कांबळे, जितेंद्र कांबळे, नेल्सन डिकॉस्टा, कामिनी कांबळे यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *