आता सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर एक हजार रुपयांना मुकाल!

शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार रूपये दंड!

Pckhabar- शहरामध्ये वाढता कोविड-19 चा पादुर्भाव लक्षात घेता   सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांना 1 हजार रूपयांचा दंड आकारण्यास स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. यासह 15 कोटी 23 लाख रूपयांच्या खर्चास  समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. पवना धरणातून से.क्र.23 जलशुध्दीकरण केंद्र निगडीपर्यंत पाणी आणण्यासाठी थेट पाईपलाईन टाकण्याच्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमणूकीला मान्यता देण्यात आली.

चिंचवड येथील मंगलमुर्ती वाडा, चाफेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिर पासूनचे थेरगाव बोटक्लब पर्यंतचा परिसर सुशोभिकरण करण्यासाठी  सुमारे 9 कोटी 1 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करणेकामी येणार्‍या सुमारे 1 कोटी 29 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. सुरक्षा विभागामार्फत ठेकेदारी पध्दतीने सुरक्षा व्यवस्था या उपक्रमान्वये सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी 55 लाख, मनपाचे विविध विभागास आवश्यक छपाई साहित्य खरेदीसाठी सुमारे 1 कोटी 22 लाख 25 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत मिलिंदनगर येथील प्रकल्पामधील इमारतीच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी सुमारे 2 कोटी 27 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *