डोक्याला पिस्तुल लाऊन महिलेचे गंठण लुटले

डोक्याला पिस्तुल लाऊन महिलेचे गंठण लुटले

Pckhabar-दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या एका चोरट्याने दुकानदार महिलेच्या डोक्याला पिस्तुल लाऊन 50 हजारांचे सोन्याचे गंठण लुटून नेले. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजता शिरगाव येथे घडली.
सुनिता संभाजी अरगडे (वय 45, रा. अरगडेवस्ती, गहुंजे रोड, शिरगाव) यांनी  तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजता फिर्यादी अरगडे त्यांच्या दुकानात होत्या. त्यावेळी दोघेजण दुचाकीवरून आले.  दुचाकी चालवणारा व्यक्ती हेल्मेट घालून दुकानात आला. दुचाकीवर मागे बसलेला व्यक्ती दुचाकीजवळ थांबला. हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने दुकानात येऊन फिर्यादी यांना गुटखा मागितला. दुकानात गुटखा नसल्याने सांगितल्यावर आरोपीने गायछाप आणि चुना पुडी मागितली. गायछाप आणि चुना पुडी काउंटर मधून काढून देत असताना हेल्मेट घातलेल्या आरोपीने अरगडे यांच्या डोक्याला पिस्तुल लावले. पिस्तुलाच्या धाकाने त्याने अरगडे यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण काढून घेतले आणि चोरटे दुचाकीवरून पळून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *