ओढ्यातील सहा फूट नर जातीची मगर अखेर पुण्याच्या रेस्क्यू टीमकडून जेरबंद 

ओढ्यातील सहा फूट नर जातीची मगर अखेर पुण्याच्या रेस्क्यू टीमकडून जेरबंद 
Pckhabar- सोलापुरातील देगाव परिसरातील घाण पाण्याच्या ओढ्यामध्ये दिसलेल्या नर जातीच्या मगरीला जेरबंद करण्यात अखेर मंगळवारी पुण्याच्या रेस्क्यू टीमला यश आले आहे.

मगर पकडण्यात आल्यामुळे आजूबाजूच्या शेतकरी आणि पशुपालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी आता सापडलेली मगर मोठी असून आणखी एक लहान मगरीचे पिल्लू याच परिसरात असून त्याचासुद्धा शोध घेण्याची मागणी या प्रभागाचे नगरसेवक गणेश वानकर यांनी केली आहे. तर या ठिकाणी पकडण्यात आलेली हि एकमेव मगर असून दुसरी कोणतीही मगर या ओढ्याच्या परिसरामध्ये नसल्याचा दावा सोलापूर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी आय. ए. एच. शेख यांनी केला आहे. 

सोलापुरातील देगाव परिसरातील घाण पाण्याच्या ओढ्यामध्ये साधारणपणे महिनाभरापूर्वी मोठ्या मगरीचे दर्शन झाल्यामुळे पशुपालक आणि नागरिकांची झोप उडाली होती . मगर नसावी असेच वनविभागाला वाटत होते.मात्र नागरिकांनी मगरीचे फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल केल्यानंतर वनविभागाने गांभीर्याने घेतले. त्यानंतर सोलापुरातील एका संस्थेला मगर पकडण्याचे काम देण्यात आले. मात्र ते लोक मगर पकडण्यास अनुभवी नसल्याची ओरड झाल्यानंतर वनविभागाने पुण्याच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *