Pckhabar- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने या ‘सेवा सप्ताह अभियानाअंतर्गत ‘वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाचा संकल्प’ असा कार्यक्रम करण्यात आला.
शहरातील 32 प्रभागांमध्ये एकाच दिवशी-एकाच वेळी ‘वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाचा संकल्प’ करीत घडवून आणला. या उपक्रमात शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार अमर साबळे, महापौर उषा उर्फ माई ढोर, महिला प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश सचिव अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी स्थायी अध्यक्ष विलास मडिगेरी आदी पदाधिकार्यांनी सेवा सप्ताह अभियानात सहभाग घेतला.










Leave a Reply