भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश

भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश
Pckhabar- निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर, आता राज्यातील वातावरण आणखीनच तापू लागले आहे. तर 2016 मध्ये भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकावर हल्ला केला होता. यासंदर्भात आता राज्यातील ठाकरे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणावरून भाजपाने शिवसेनेला घेरले असतानाच, ठाकरे सरकारनेही भाजपाला अडचणीत आणले आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिक सोनू महाजन यांना मारहाण केली होती. याप्रकरणी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिला आहेत. यामुळे भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

“२०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *