रोटरी क्लब ऑफ देहूतर्फे कोविड सेंटरला पीपीई किट, फेस शिल्डची मदत

रोटरी क्लब ऑफ देहूतर्फे कोविड सेंटरला पीपीई किट, फेस शिल्डची मदत

Pckhabar- रोटरी क्लब ऑफ देहूच्या वतीने देहू कोविड सेंटरला पीपीई किट आणि फेस शिल्डची मदत करण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्याकडे किट आणि फेस शिल्ड सुपूर्द करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अजित चव्हाण, सचिव प्रा. संदीप भोसले, कांतीलाल काळोखे, भैयासाहेब कारके, गणेश सावंत, योगेश काळोखे, व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, रामदास साठे, शांताराम हगवणे आणि सर्व रोटेरियन्स आणि पदाधिकारी उपस्थित होते.

देहू आरोग्य विभागाचे काम उत्कृष्ट असून दखलपात्र आहे. शासकीय यंत्रणेला नागरिकांची साथ आणि पाठिंबा असेल तर मोठे काम उभे राहते याचा आदर्श म्हणजे देहूचे कोविड सेंटर असे कौतुक करत प्रा. प्रदीप कदम यांनी रोटरीच्या वतीने डॉ. किशोर यादव यांचे अभिनंदन केले. संदीप भोसले यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *