सरकारने महिला रोजगारासाठी पाऊल उचलावे : दुर्गा भोर यांची मागणी

सरकारने महिला रोजगारासाठी पाऊल उचलावे

दुर्गा भोर यांची मागणी
Pckhabar- महाराष्ट्रामध्ये हजारो एटीएम सेंटर शेकडो मॉल आहेत. हजारो एटीएम सेंटरमध्ये परराज्यातील नागरिकांना काम दिले जाते. परंतु जर एटीएम सेंटरमध्ये दिवस पाळीला महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती केल्यास राज्यातील हजारो महिलांना रोजगार निर्माण होऊ शकतो. राज्यातील बेकरीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. सरकारने महिला रोजगारासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी दुर्गा बिग्रेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी केली आहे.
दरम्यान, तरुण तरुणींच्या आणि महिलांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आणि युवा वर्गाला स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर करण्यासाठी दुर्गा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना करण्यात आली. दुर्गा भोर या संस्थापक अध्यक्ष असून मुख्य सरचिटणीस अभय भोर आहेत.  
महिलांच्या मागणीसाठी अध्यक्षा दुर्गा भोर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, राज्यातील लाखो महिला बेरोजगारीला कंटाळल्या असून अनेक बचत गटांची कामे सुद्धा बंद पडली आहेत. तरुणींना नोकरी नसल्याने अनेक तरुणींची लग्नसुद्धा या कारणास्तव थांबलेली आहेत. त्याचा मानसिक परिणाम या तरुणींवर होत आहे.  महिला अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.  समाजामधील अनेक महिला या बेरोजगार आहेत. यामध्ये उच्चशिक्षित महिलांची मोठी संख्या असून अनेक उच्च शिक्षित तरुणी कामातून बेरोजगार आहेत. अनेक शासकीय खात्यांमध्ये महिला वर्गाला प्राधान्य देऊन रोजगाराच्या संधी उत्पन्न करून दिल्यास महिला संधीचे सोनं करून दाखवतील असे दुर्गा भोर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *