Good News: देहूगाव परिसरात आज एकही कोरोना रूग्ण आढळला नाही

Good News: देहूगाव परिसरात आज एकही कोरोना रूग्ण आढळला नाही

कोरोनाच्या 22 रुग्णांना डिस्चार्ज

Pckhabar –देहूगाव परिसरात सोमवारी एकही नवीन कोरोना रूग्ण आढळला नाही. त्यामुळे देहूगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 581 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 481 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

89 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये 59 रूग्णांना लक्षणे नसून 30 रुग्णांना लक्षणे आहेत. 30 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे. तर तीर्थक्षेत्र देहूगावच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 39 रुग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *