सौ. पठाण जीनत नासीर (उपशिक्षिका, संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू.)
Pckhabar- आपल्या भारत देशात दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताच्या कार्यकारी आणि राष्ट्रभाषेचा दर्जा अधिकारी रूपात देण्यात आला. तसेच संपूर्ण देशात 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
हिंदी दिवस भारतात सर्व शाळा, कॉलेज, ऑफिस, विविध संस्था, बँका आदीमध्ये धुमधडाक्यात साजरा केला जातो. कार्यक्रमात हिंदी विषयी जनजागृती केली जाते. विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमधून आपणास हिंदी विषयी ज्ञान व आधार वाढवण्याची एक संधी मिळते.
हिंदी जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा मानली जाते. हिंदी नेपाळ, मॉरिशस, बांगलादेश, पाकिस्तान या देशांमध्ये बोलली जाते. भारतात सर्वाधिक लोक मातृभाषा म्हणून हिंदीचा प्रयोग करतात.
ज्याप्रमाणे आपण राष्ट्राच्या विविध प्रतीकांचे योग्य तो आदर सत्कार करतो, त्याचप्रमाणे देशाची एक प्रमुख भाषा आपण राष्ट्रभाषा म्हणतो तर हिंदी आपले अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे तिचा सन्मान नक्कीच व्हायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाचे परम कर्तव्य आहे की आपल्या राष्ट्र भाषेच्या आदर करावा.
हिंदी दिवस हा एक असा दिवस आहे, ज्यादिवशी खऱ्या अर्थाने हिंदी विषयी आपले प्रेम आपण सर्वांसमोर अभिप्रेत करू शकतो. हिंदीच्या अंगीकाराने कोण कोणते फायदे होऊ शकतात, त्याचा राष्ट्र विकासात कसा सहभाग होऊ शकतो? तसेच आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रभावना कशी निर्माण केली जाते हा हिंदी दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे.










Leave a Reply