देहूगाव कोविड सेंटरसाठी पीपीई किट
Pckhabar- युवा उद्योजक भरत काळोखे, अमोल काळोखे, सौरभ काळोखे यांच्या वतीने तीर्थक्षेत्र देहूगाव येथील कोविड केअर सेंटरसाठी 10 पीपीई किट मोफत देण्यात आले.
हे किट देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी स्विकारले. याप्रसंगी देहूचे उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे उपस्थित होते.
देहूगाव परिसरात कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरात कोरोनाबाधितांची संख्या सहाशेच्या जवळ गेली आहे. तर सुमारे साडेचारशे रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.










Leave a Reply