भोसरीतील रोहित्र स्फोटप्रकरण; अतिरिक्त कार्यकारी अभियंता, दोन तंत्रज्ञांचे निलंबन

भोसरीतील रोहित्र स्फोटप्रकरण;
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, दोन तंत्रज्ञांचे निलंबन
Pckhabar- : भोसरी येथील इंद्रायणी नगर मध्ये विद्युत रोहिजाच्या स्फोटप्रकरणी महावितरणकडून करण्यात आलेल्या प्राथमिक कारवाईत भोसरी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता व दोन तंत्रज्ञांना निलंबित करण्यात आले आहे.

सध्या या स्फोटाची राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षकांकडून तसेच महावितरणच्या तीन सदस्यीय समितीकडून चौकशी सुरु आहे. हे दोन्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी संबंधीत दोषींविरुध्द शिस्तभंग कारवाई करण्यात येणार आहे. ही चौकशी सुरु असताना महावितरणकडून प्राथमिक कारवाई म्हणून भोसरी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता व दोन तंत्रज्ञांना दि. 9 सप्टेंबरला निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिनही मृतकांच्या कुंटुबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची कार्यवाही महावितरणकडून सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *