पत्नीच्या पूर्व प्रियकराचा खून, दोघे पोलिसांच्या ताब्यात
Pckhabar- पत्नीचे विवाहापूर्वी एका तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर चिडलेल्या पतीने साथीदाराच्या मदतीन त्याचा धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या सुमारास जिल्हा रुग्णालय औंध कॅम्पच्या आवारात घडली. दरम्यान, युनिट चारच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सौरभ व्यंकट जाधव (वय 28, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सुशांत व्यंकट जाधव (वय 24) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयाज शेख (रा. शिवाजीनगर, पुणे) आणि सोन्या बाराथे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयाज याच्या पत्नीचे विवाहापूर्वी मयत तरुण सौरभ याच्यासोबत प्रेम संबंध होते. त्यानंतर आयाजचा त्या तरुणीसोबत विवाह झाला. मात्र, विवाहापूर्वी असलेल्या प्रेम संबंधाची माहिती मिळाल्यानंतर आयाजच्या याचा मनात होता. त्या रागातून आयाजने त्याच्या मित्रासोबत मिळून सौरभला औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नेऊन कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केले. सौरभ याच्या कानावर, मानेवर तसेच हातावर गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.










Leave a Reply