50 हजार पिंपरी-चिंचवडकरांनी जिंकली कोरोना विरोधातील लढाई!
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख असून त्यापैकी 63 हजार 622 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 2.54 टक्के आहे. बाधितांपैकी तब्बल 50 हजार 41 नागरिकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.65 टक्के आहे. तर, सुमारे 12 हजार सक्रिय रुग्ण असून त्याचे प्रमाण 18.86 टक्के आहे. आजपर्यंत 1039 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.63 टक्के आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, अर्धा मे महिना परिस्थितीवर महापालिका नियंत्रण ठेवू शकली. रुग्ण संख्या आटोक्यात राहिली. परंतु, मे महिन्याच्या मध्यानंतर शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. दिवसाला 100 हून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत होते. त्यानंतर त्यामध्ये वाढ होऊ लागली. त्यांनतर जून, जुलै, ऑगस्ट मध्ये रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली. सप्टेंबरमध्ये देखील रुग्णवाढ सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून तर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला एक हजार ते बाराशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शहरातील रुग्णसंख्या वाढत असून सक्रिय रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखाच्या आसपास आहे.
10 मार्च ते 13 सप्टेंबरपर्यंत शहरातील 63 हजार 622 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 2.54 टक्के आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आजपर्यंत 50 हजार 41 जणांनी कोरोना विरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.65 टक्के आहे. आजमितीला सुमारे 12 हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचे प्रमाण 18.86 टक्के आहे. तर, शहरातील 1039 जणांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. त्याचे प्रमाण 1.63 मृत्यूचे प्रमाण आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसाला 20 ते 25 जणांचा मृत्यू होत आहे.
कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?
22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 25,689 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 19, 605 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 60 वर्षापुढील 8237 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 5476 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 5212 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.










Leave a Reply