बिहार निवडणूकीत फायदा होण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी : आमदार पवार

बिहार निवडणूकीत फायदा होण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी : आमदार पवार

Pckhabar- बिहार निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू झाले. आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण, माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळे आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे.

याबाबत आमदार पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झालं, आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार, खून असे गंभीर गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत. सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होत आहेत.

महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभा राहणार सरकार आहे. मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठरावीक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात.

बिहार निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले. आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहार मध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण, माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळे आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत, असे दिसतंय. परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचे काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *