‘मी ड्रग्सचे व्यसन करत होते’; कंगना रणौतचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Pckhabar- वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी आणि ड्रग्स प्रकरणी बॉलिवूड कलाकारांवर आरोप करणारी अभिनेत्री कंगना रणौत स्वत: देखील ड्रग्स घेत होती ? तिचा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे ड्रग्स प्रकरणी तिचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अभिनेत्री कंगना रणौत सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. “बॉलिवूडमधील ९० टक्के कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात. त्यामुळे शूटिंगला परवानगी देण्यापूर्वी त्यांची ड्रग्स टेस्ट करा, असा खळबळजन आरोप कंगनाने केला होता. तिच्या आरोपांना प्रत्युत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या थ्रोबॅक व्हिडीओमध्ये कंगना ड्रग्स व्यसनाचा अनुभव सांगताना दिसत आहे.
“मी घरातून पळाले होते. दिड-दोन वर्षात मी एक फिल्म स्टार झाले. त्याच वेळी मला ड्रग्सचं व्यसन लागलं होतं. माझी अवस्था खूप विचित्र झाली होती. मी वाईट लोकांच्या संगतीत होते.” असा अनुभव कंगनाने या व्हिडीओमध्ये सांगितला आहे.
दरम्यान, “मी आयुष्यात कधीही ड्रग्सचं सेवन केलं नाही, मी ड्रग्स टेस्ट द्यायलाही तयार आहे” असं कंगनाने इतर कलाकारांवर आरोप करताना म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर तिचा हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.










Leave a Reply