महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Pckhabar- महाराष्ट्रात कोरोनाचे संकट हे कायम आहे. हे संकट असताना राजकीय वादळ उठत आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, त्यामुळे सर्व लक्षात ठेवून काम करतोय, अन्यथा उत्तर देण्यास कमी करणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
कोरोनाचे संकट संपले असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही लोकांनी पुन्हा राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे. योग्य वेळी सर्वांना उत्तरे देईल.
कोरोनाकाळात मी गरज नसेल तर बाहेर पडू नका, असे आवाहन मी केले आहे. मात्र मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावे अशी मागणी केली जात आहे. मात्र तुम्ही जिथे पोहोचला नाही अशा ठिकाणी मी जाऊन आलो आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिथे पोहोचलो आहे. अनेकांशी चर्चा केली आहे, करत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.










Leave a Reply