दाऊद फाऊदमुळे नाही, एमआयडीसी मधील भूखंड प्रकरणात खडसे यांना राजीनामा द्यावा लागला – चंद्रकांत पाटील
Pckhabar- पिंपरी-चिंचवड येथील एमआयडीसी मधील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. दाऊद फाऊदमुळे द्यावा लागला नाही. त्यात 24 तासात क्लीन चिट दिली होती, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. फडणवीस यांनी मला त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांचे नाव घेवून टीका करत आहे. सर्वांना क्लीन चीट दिली. पण, मला दिली नाही. राजीनामा मी स्वतःहून दिला नाही. तर तो माझ्याकडून घेतला गेला असे खडसे यांनी आज स्पष्ट केले आहे. नाना फडणवीसांचे बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहीत असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
मोरवाडीतील पक्ष कार्यालयात आलेल्या पाटील यांना याप्रकरणी पत्रकारांनी छेडले असताना ते म्हणाले, संघटनेत वाद असतात. ते वाद बंद खोलीत बसून संपवायचे असतात. नाथाभाऊ ओपनली मांडत आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले घरातील धुणी रस्त्यावर येवून ध्यायला नको असे म्हटले आहे. काही जण नाथाभाऊशी बोलत आहेत. त्यांचे म्हहणे ऐकून घेतले जात आहे. फडणवीस यांनी आपली भूमिका वारंवार मांडली आहे.










Leave a Reply