स्वतःच्या वापरत्या गाडीचे रुग्णवाहिकेत रूपांतर करून कोविड केअर सेंटरसाठी भेट
Pckhabar- कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यांना एका रुग्णालयातून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. नातेवाईकांना तासंतास रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणारा हा त्रास ठाळण्यासाठी लोणावळ्यातील डॉ. सिमा शिंदे व त्यांचे पती डॉ. सुभाष शिंदे यांनी स्वतःच्या घरात वापरात असलेल्या ओमनी गाडीचे रुपांतर रुग्णवाहिकेत करून ती टाकवे बु. येथील समुद्रा कोविड केअर सेंटरला दिली आहे. आजून एका रुग्णवाहिकेचे काम सुरू असून एक नविन रुग्णवाहिका घेण्यात येणार असल्याचे डॉ. सिमा शिंदे यांनी सांगितले.
डॉ. शिंदे यांनी स्वतःची गाडी रुग्णवाहिकेत बदलून याठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. कै. शांतारामबाबा शिंदे यांच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका दिली असून आजून दोन रुग्णवाहिका येत्या काही दिवसात कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्यांनी तळेगाव लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी समुद्रा कोविड केअर सेंटरसाठी हॅन्डग्लोज, प्लस आँक्सिमिटर, टेंम्प्रेचर गण असे सुमारे 50 हजार रुपयांचे वैद्यकीय साहित्य मिळवून घेतले तर पंचायत समिती सदस्य महादू उघडे यांनी वाफ घेण्याच्या 20 मशिन येथे भेट दिल्या.










Leave a Reply