पत्रकारांसाठी रूग्णालयात राखीव खाटा ठेवा: अण्णा जोगदंड
Pckhabar- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेमध्ये काम करणार्या पत्रकारांने जिवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या काळात अन्याय, अत्याचाराविरुद्धचे वास्तव समाजासमोर आणत आहेत. कोरोनामुळे पुण्यासह राज्यात काही पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी रूग्णालयात राखीव खाटा ठेवण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केली आहे.
याबाबत जोगदंड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, देशाचा कोरोनाचा कहर सुरू असून रूग्ण संख्येत जगात देशाचा दुसरा क्रमांक आहे.
महाराष्ट्रातही रूग्ण संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यासह पुण्यात पांडुरंग रायकर सारख्या तरुण पत्रकाराला पत्रकरिता करत असताना कोरोना झाला. त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाने 50 लाखांचा विमा संरक्षण पत्रकारांना द्यावा व त्यांनाही डॉक्टर, नर्स प्रमाणे कोरोना योद्धा म्हणून घोषित करावे. प्रत्येक रूग्णालयामध्ये राखीव खाटांची तरतुद करावी, अशी मागणी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, आळंदी सचिव रवी भेंनकी, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिकर आदींनी केली आहे.










Leave a Reply