Dehu News : कोव्हिड योद्धा डॉ. यादव दाम्पत्याचा सन्मान
Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीत एकही दिवस सुट्टी न घेता कोरोना रुग्णांची सेवा करणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव आणि डॉ. विद्या यादव यांचा युथ क्लब देहुगावच्या वतीने सन्मान करण्यात आला.
तीर्थक्षेत्र देहूगाव परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत 560 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. येथील कोव्हिड सेंटरमधून आतापर्यंत 413 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
युथ क्लब देहुगावच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना रूग्णांची सेवा करत असलेल्या डॉ. किशोर यादव आणि डॉ. विद्या यादव यांचा ‘ प्रतिपश्चंद्र कादंबरी’ सप्रेम भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी युथ क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.










Leave a Reply