चीनच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा प्रसार; कोरोना मानवनिर्मित असल्याचा विषाणुशास्त्रज्ञ ली-मेंग यांचा दावा

चीनच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा प्रसार; कोरोना मानवनिर्मित असल्याचा विषाणुशास्त्रज्ञ ली-मेंग यांचा दावा

Pckhabar- चीनवर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा सातत्यानं आरोप केला जात आहे. या धोकादायक विषाणूच्या उत्पत्तीबद्दल अमेरिका ते युरोपपर्यंत अनेक देश चीनला दोषी मानत आहेत. चिनी सरकारच्या धमकीनंतरही स्वत: अमेरिकत वास्तव्यास असलेल्या चिनी महिला विषाणुशास्त्रज्ञांनी कोरोना विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा केला आहे. व्हायरोलॉजिस्ट ली-मेंग यान यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पुरावे आहेत, जे ती लवकरच सादर करणार आहे. चीनने या विषाणूबद्दल बरेच काही लपवून ठेवले आहे आणि चीनमधला हा मानवनिर्मित व्हायरस असल्याचा आपण म्हणू शकतो, असे सांगत त्यांनी चिनी सरकारवर ठपका ठेवला. माझ्याकडे याचा पुरावा आहे आणि मी ते सिद्ध करेन.

ली मेंग म्हणतात, की चीनच्या सरकारच्या धमकीनंतर मी हॉंगकॉंग सोडून अमेरिकेत स्थलांतरित झाले, पण माझी सर्व वैयक्तिक माहिती सरकारी डेटाबेसमधून मिटविली गेली आणि माझ्या सहका-यांना माझ्याबद्दल अफवा पसरविण्यास सांगण्यात आले.

ली-मेंग म्हणाल्या, कोरोना वुहानच्या मांस बाजारातून आलेला नाही, कारण मांस बाजार ही स्मोक स्क्रीन आहे, तर व्हायरस निसर्गाची निर्मिती नाही. जर हा विषाणू वुहानच्या मांस बाजारातून आला नाही, तर मग त्याचा कसा उद्भव झाला. यावर उत्तर देताना ली मेंग म्हणाल्या की, हा धोकादायक विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला आहे आणि तो मानवनिर्मित आहे. या विषाणूचा जीनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिंट सारखा आहे आणि त्याच्या आधारे हे सिद्ध होते की हा मानवनिर्मित व्हायरस आहे. कोणत्याही व्हायरसमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेसे आहे की, तो मनुष्याने उत्पन्न केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *