…अन्यथा ठोक मोर्चे निघतील!
Pckhabar- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत राज्य सरकारने एका महिन्याच्या आत फेरविचार याचिका दाखल करावी अन्यथा ठोक मोर्चे निघतील असा इशारा सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जगाला हेवा वाटेल असे विक्रमी ५८ मुक मोर्चे काढल्यानंतर तसेच ४२ मराठा बांधवांचे बळी गेल्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने राज्य मागासवर्गीय आयोग नेमुन निवृत्त न्यायमूर्ती माननीय गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज हा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागास आहे असा अहवाल दिला होता. या अहवालानुसार मराठा समाजाला शिक्षण व नौकरी मध्ये आरक्षण मिळाले होते हि सर्व प्रक्रिया घटनेनुसार संविधानाच्या चौकटीत पार पडली होती.
सदर आरक्षणास आजवर कुठलीही स्तगिती मिळाली नव्हती. परंतू सध्याच्या राज्य सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे सरकारने दिलेले वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडलेले दिसुन आले आहे त्यामुळे तळागाळातील मराठा समाज बांधव या विषयी तीव्र संताप व्यक्त करीत आहे. सरकारने चांगल्या दर्जाचे वकील देऊन मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तातडीने दाखल करुन.
मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती कायदेशीर मार्गाने उठवून मराठा मोर्चाच्या वेळी मराठा समाजाने केलेल्या मागण्या प्रलंबित असलेल्या पुर्ण करण्यात याव्यात हि समस्त मराठा समाजाची मागणी आहे. तसेच जो पर्यंत आरक्षणाची स्थगिती उठत नाही तोपर्यंत मराठा विद्यार्थ्यांची ५०% फि राज्य सरकारने भरावी व एक महिन्याच्या आत महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती न्यायालयातुन उठवून मराठा समाजाला न्याय द्यावा अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुक मोर्चे नाही ठोक मोर्चे नाही तर या सरकारच्या विरुद्ध आक्रमक आंदोलने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात येत आहे. आणि मराठ्यांनी अनेकदा इतिहास घडवून दाखवला आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी तसेच आजवर झाले नाही असे आंदोलने या पुढील काळात होतील आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला यावेळी राज्य समन्वयक प्रकाश जाधव, राज्य समन्वयक धनाजी येळकर पाटील, जिल्हा समन्वयक सतिश काळे, गणेश दहिभाते, ज्ञानेश्वर लोभे, राजू पवार हे उपस्थित होते










Leave a Reply