किशोर आवारे यांच्यातर्फे तळेगावकरांसाठी मोफत अॅम्बुलन्स
Pckhabar- जनसेवा विकास समितीचे प्रमुख किशोर आवारे यांच्याकडून तळेगावकरासाठी 24 तास मोफत अॅम्बुलन्स देण्यात आली आहे.
अॅम्बुलन्स देण्याचा कार्यक्रम येथील मराठा क्रांती चौकात पार पडला.
या वेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस,कल्पेश भगत, सुनिल पवार, राहुल जाधव, अनिल पवार, संजय चव्हाण, गौरव खांडगे आदि मान्यवर उपस्थित होते.
जनरल हॉस्पिटलच्या गेट जवळ दि.9 रोजी एक मृतदेह अॅम्बुलन्स विना चार तास पडून होता. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी किशोर आवारे यांना संपर्क साधला. त्यांनी तत्परता दाखवत त्या मृतदेहाची विधिवत अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलली. 24 तासाच्या आत समस्त तळेगावकरांसाठी 24 तास मोफत अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. या समाजपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या मोफत अॅम्बुलन्सची व्यवस्था (विठ्ठल – 8208870169) यांच्यावर सोपवली असून गरजवंतानी त्यांच्याशी संपर्क करावा, असे कल्पेश भगत यांनी सांगितले.










Leave a Reply