तळेगावात कोरोना रूग्णांची वाढती संख्या; बेडची संख्या वाढवा-नगराध्यक्षा चित्रा जगनाडे

तळेगावात कोरोना रूग्णांची वाढती संख्या; बेडची संख्या वाढवा-नगराध्यक्षा चित्रा जगनाडे
Pckhabar- तळेगाव दाभाडे परिसरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील मायमर मेडिकल  रुग्णालयात वैद्यकीय सेवे अंतर्गत अतिरिक्त बेड्स व इतर अनुषंगिक सेवाची संख्या वाढवावी, अशी मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी पत्राद्वारे केली.
मायमर मेडिकल कॉलेजचे अधिक्षक यांना हे पत्र दिनांक 10 रोजी दिले आहे. यामध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये कोरोना संक्रमणाचे बाधित झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तसेच या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नगरपरिषद कार्यालयीन माहितीनुसार सध्या आपले रुग्णालयांमध्ये एकूण बेडची  संख्या 356 इतकी आहे. तर सहा वेंटिलेटर व दहा आय सी यु बेड्स रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. तळेगाव दाभाडे शहरांमध्ये नगर परिषदेने केलेल्या घरी भेट सर्वेक्षणानुसार व एकंदरीत बाधित रुग्णांचा इतिहास पाहता लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचविणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे क्रमप्राप्त झाले आहे.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व भविष्यातील रुग्णांची संख्या लक्षात घेता पुढील खबरदारीच्या दृष्टीने आपले रुग्णालयांमध्ये अतिरिक्त बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू व इतर अनुषंगिक रुग्णसेवा वाढविण्यात याव्यात, असे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी पत्रामध्ये नमूद केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *