‘घरकुल योजने अंतर्गत अर्ज भरण्याची मुदत वाढवावी’

‘घरकुल योजने अंतर्गत अर्ज भरण्याची मुदत वाढवावी’
Pckhabar-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घरकुल योजनेंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम मुदत 18 सप्टेंबर असून अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अद्यापही शहरातील हजारो नागरिकांनी विविध कारणास्तव अद्यापही अर्ज भरलेला नाही. त्यामुळे महापालिकेने अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव, नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी महापौर उषा (माई) ढोरे यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.

सदर निवेदनात यादव यांनी म्हंटले आहे की, शहरात मोजक्याच ठिकाणी महा-ई सेवा केंद्र आहेत. त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. मात्र वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता करण्यास लागणारा वेळ अशा अनेक गोष्टींमुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्याने अद्यापही हजारो नागरिकानी अर्ज भरलेला नाही.
त्यामूळे महापालिका प्रशासनाने घरकुलसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती दिनेश यादव, नगरसेवक कुंदन गायकवाड, रामकृष्ण लांडगे यांनी  यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *