आपल्या भागात कोरोनाचे किती ॲक्टीव्ह रुग्ण?

आपल्या भागात कोरोनाचे किती ॲक्टीव्ह रुग्ण?
Pckhabar- पिंपरी-चिंचवड पालिकेच्या ‘ब’ प्रभागाच्या रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड हद्दीत कोरोनाचे सर्वाधिक 1574 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 1529 रुग्ण आहेत. हे दोनही प्रभाग  कोरोना हॉटस्पॉट आहे. तर, सर्वात कमी म्हणजेच 783 रुग्ण ‘ड’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

 

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. गुरुवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड ‘ब’ कार्यालयाच्या हद्दीत 1574 सक्रिय रुग्ण आहेत.

 क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,  मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 1457 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सर्वाधिक म्हणजेच 1574 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 884 रुग्ण आहेत.

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे सर्वात कमी म्हणजेच 783 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे 1519 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. प्रभागातील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात येत आहे. ,

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 1503 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 1290 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे 923 सक्रिय रुग्ण आहेत.  सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

शहरातील 9 हजार 933 सक्रिय रुग्णांवर पालिका रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 59 हजार 966 वर पोहोचली आहे. शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 60 हजार जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी 45 हजार 732 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  शहरातील 980 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 244 अशा 1224 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *