देहूगाव परिसरात कोरोनाचे 15 नवे रुग्ण, 6 रुग्णांना डिस्चार्ज

देहूगाव परिसरात कोरोनाचे 15 नवे रुग्ण, 6 रुग्णांना डिस्चार्ज

Pckhabar -देहूगाव परिसरात कोरोनाचे गुरूवारी 15 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 543 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 398 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

134 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये 97 रूग्णांना लक्षणे नसून 37 रुग्णांना लक्षणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *