नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ अॅक्शन मोडमध्ये; कोरोना बाधित रुग्णांची केली विचारपूस
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी बुधवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी आज गुरुवारी महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये पाहणी करत कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस केली.
पीपीई कीट घालून विरोधी पक्षनेते मिसाळ सेंटर ची पाहणी केली. सेंटरमध्ये काही त्रुटी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या त्रुटी संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून मार्गी लावण्यात येतील, असेही ते म्हणाले.










Leave a Reply