संभाजी विडीचे नाव बदलणार; शिवप्रेमींच्या मागणीला यश

संभाजी विडीचे नाव बदलणार; शिवप्रेमींच्या मागणीला यश
Pckhabar-गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या व मागील काही दिवसांपासून शिवप्रेमींनी पुन्हा ऐरणीवर आणलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाचा एक विषय कायमचा निकाली निघणार आहे. पुण्यातील साबळे वाघिरे आणि कंपनीने ‘संभाजी विडी’ या आपल्या उत्पादनाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पत्रक कंपनीनं प्रसिद्धिस दिलं आहे.

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या संभाजी महाराजांचं नाव एका विडीला देण्यावरून शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या. यापूर्वीही याबाबतच्या चर्चेला अनेकदा तोंड फुटलं होतं. मात्र, यावेळी संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी हा विषय लावून धरला होता. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलनही सुरू केलं होतं. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *