जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांच्या पाठपुराव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला तीन लाखांची औषधे

जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांच्या पाठपुराव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला तीन लाखांची औषधे

Pckhabar- देहूगाव परिसरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रूग्णांसाठी आवश्यक त्या औषधांसाठी आरोग्य विभागाशी सातत्याने पाठपुरावा करून सुमारे तीन लाख रुपयांची औषधे देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्याकडे सुपूर्द केली, अशी माहिती शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला खंडागळे यांनी दिली.

यावेळी श्री. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. मधुकर महाराज मोरे, विश्वस्त ह. भ. प. संजय महाराज मोरे, फार्मासिस्ट सुनिता लांडगे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

खंडागळे म्हणाल्या, कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. देहूगाव आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचे हे संक्रमण रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स यांच्यासह आदी कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत. ही महामारी रोखण्यासाठी आरोग्य विभागाशी सातत्याने पाठपुरावा करून सुमारे तीन लाख रूपयांची औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि श्री संत तुकाराम महाराज, देहू संस्थानमध्ये औषधे दिली आहेत. तसेच जिल्हा परिषद गटातील वडगाव शिंदे आणि निरगुडी गावामध्येही औषधे   देण्यात येणार असल्याचे सदस्या शैला खंडागळे यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *