मराठीतील सिनेकलाकारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मराठीतील सिनेकलाकारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
 Pckhabar-मराठीतील दिग्गज सिनेकलाकारांनी आज (बुधवार) अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता दगडू फेम प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *