निगडीत उद्या आंदोलन

निगडीत उद्या आंदोलन

Pckhabar- छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांची किर्ती सार्‍या जगात पसरली आहे. त्यांच्याच नावाने महाराष्ट्रात 70 वर्षांपासून धुम्रपान उत्पादन गेले जात आहे. या विडीवरील संभाजी नाव त्वरीत काढावे, या मागणीसाठी राजे प्रतिष्ठानच्या वतीने (गुरूवार) निगडीत आंदोलन करण्यात येणार आहे.

निगडीतील भक्ती-शक्ती समूह येथे सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. या विडी उत्पादनावरील छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव हटवा हा नारा देत शिवधर्म फाऊंडेशन या संघटेनकडून किल्ले पुरंदर पायथ्याला उपोषण सुरू आहे.

या आंदोलनालाही राजे प्रतिष्ठानकडून जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे, अशी माहिती राजे प्रतिष्ठानचे आकुर्डी विभागप्रमुख पवन तिकुडवे-पाटील, संघटक जितू पवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *