कोरोना नियंत्रणासाठी कठोर निर्णय घ्या, सर्वपक्षीय सदस्यांची मागणी
Pckhabar-रुग्णास कोरोना संक्रमण झाले की नाही याची खाजगी लँबमधून तपासणी केल्यानंतर रुगणांचा स्वॅब जर संक्रमित असेल तर त्याची माहिती खाजगी लँबकडून लागलीच नगरपरिषदेस मिळावी. तसेच संक्रमित रुग्ण असताना देखील कोणत्या प्रकारचे उपचार न करता रुग्ण मोकाट फिरत असेल तर त्याच्यावरती गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जनसेवा विकास समितीचे प्रमुख किशोर आवारे व सहकार्यांनी केली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांनी वाढत चाललेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव याबाबत नियोजन करण्यासाठी मंगळवारी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जगनाडे होत्या. यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, सभागृहनेते अमोल शेटे, जनसेवा विकास समितीचे प्रमुख किशोर आवारे, नगरसेवक गणेश खांडगे, सुशील सैंदाणे, संतोष भेगडे, अरुण माने, रोहित लांगे, निखिल भगत, नगरसेविका शोभा भेगडे, कल्पना भोपळे, अनिता पवार, संगीता शेळके, हेमलता खळदे, संध्या भेगडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, कोरोना कक्ष प्रमुख जयंत मदने आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी तळेगाव आणि परिसरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कशामुळे होत आहे. त्याची कारणे, त्यावरचे उपाय, तसेच नियोजन याबाबत मान्यवरांनी सखोल चर्चा केली. यामध्ये स्मशानभुमीमध्ये घेण्यात येत असलेल्या पैशाबाबत, नगरपरिषदेमध्ये ठेवण्यात येणारे रुग्णाचे रेकॉर्ड व्यवस्थित मिळणेबाबत, परिसरामधील रुग्णालयात महात्मा फुले योजना राबवली जाते की नाही याबाबत, मायमर रुग्णालयामध्ये नगरपरिषदेच्या कर्मचार्यांना प्रतिसाद मिळत नसल्याबाबत, खाजगी लॅब मधील रिपोर्ट बाबत, काही ठिकाणी कठोर निर्णय घेऊन चुका करणार्यावर गुन्हा नोंद करणे बाबत, तसेच जिल्हाधिकार्यांची तळेगाव दाभाडे परिसरात वाढत असलेल्या रुग्ण संख्येच्या नियोजनासाठी बैठक घेण्याबाबत सखोल चर्चा झाली.










Leave a Reply