चारित्र्यावर संशय घेणार्या पतीचा पत्नीने केला खून
Pckhabar- पती चारित्र्यावर संशय घेऊन दारू पिवून वारंवार मारहाण करणार्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने भावाच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. ही घटना जाधववस्ती येथे घडली.
लखीचंद प्रभुदयाल शर्मा (वय-40, रा. जाधववस्ती, ता. हवेली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. प्रेमचंद प्रभुदयाल शर्मा (वय 58) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पत्नी अनिता लखीचंद शर्मा (वय 35) हिचावर गुन्हा दाखल करत तिचा चुलत भाऊ तुकाराम भीमाशंकर नाटेकर (वय-29) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लखीचंद आणि आरोपी अनिता पती-पत्नी आहेत. लखीचंद हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दारू पिऊन तिला वारंवार मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून अनिताने तिचा चुलत भाऊ आरोपी तुकाराम याच्यासोबत मिळून लखीचंदचा गळा दाबून खून केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
चारित्र्यावर संशय घेणार्या पतीचा पत्नीने केला खून










Leave a Reply