शहरात आज 1014 नवीन रुग्णांची नोंद, 515 जणांना डिस्चार्ज, 24 मृत्यु

शहरात आज 1014 नवीन रुग्णांची नोंद, 515 जणांना डिस्चार्ज, 24 मृत्यु
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 104 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 57 हजार 507 वर पोहोचली आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 515 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 16 आणि पालिका हद्दीबाहेरील 8 अशा 24 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये पिंपरी, मोशी, अजमेरा, काळेवाडी, पिंपळेगुरव, तळवडे, चिखली, रहाटनी, भोसरी, निगडी, बिजलीनगर, दिघी, पिंपळेसौदागर, आळंदी, आंबेगाव, मंचर, बारामती, खंडाळा येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शहरात आजपर्यंत 57 हजार 607 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 44 हजार 801 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 959 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 236 अशा 1195 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5693 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *