’अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली’
Pckhabar-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज (मंगळवारी) सभागृहात खंत व्यक्त केली.
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोर्हे विधानपरिषदेच्या उपसभापती पदी आल्या आणि आमचे सरकार आलं, म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केलं असे उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात म्हणाले. त्यावर बोलताना अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं? असा टोला दरेकर यांनी लगावला. अजित पवारांच्या पायगुणाचा उल्लेख करत असताना, त्यांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली ही खंत प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली.










Leave a Reply