कोरोना काळात ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना गुंडाळल्याने पालिका कर्मचारी आक्रमक

कोरोना काळात ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना गुंडाळल्याने पालिका कर्मचारी आक्रमक

काळ्या फिती बांधून निषेध

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांसाठी लाभदायक ठरत असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना कोरोनाच्या महामारीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुंडाळली आहे. कोरोना कालावधी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या काळात कर्मचाऱ्यांचा विरोध डावलून योजना बंद केल्याने कर्मचारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्मचारी काळ्या फिती बांधून काम करत निषेध करत आहेत.

पिंपरी-चिंचवड पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांना काळ्या फिती बांधण्यात येत आहेत. कर्मचारी आज (मंगळवारी) काळी फित बांधून दिवसभर काम करणार आहेत.

महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून ही योजना बंद करण्याचा घाट घातला जात होता. त्याऐवजी विमा पॉलिसी आणण्याचे प्रयत्न झाले. त्याला महासंघाने तीव्र विरोध केला आहे. असे असताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अचानक 14 सप्टेंबर 2020 पासून रात्री 12 नंतर ही योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. तथापि, प्रशासकीय कारणास्तव ही योजना 14 सप्टेंबर पासून स्थगित करण्यात येत आहे. कृपया सर्व पॅनेलवरील रुग्णांलयांनी याची नोंद घेवून 15 सप्टेंबरच्या पहाटे एक नंतर धन्वंतरी योजनेतील कोणत्याही सभासदांना या योजनेअंतर्गत उपचाराकरिता दाखल करून घेवू नये असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *