जम्बो कोविड सेंटरमधील बाउन्सर त्वरीत हटवा

जम्बो कोविड सेंटरमधील बाउन्सर त्वरीत हटवा
Pckhabar- पुणे येथिल जम्बो कोविड केअर सेंटर येथे नेमण्यात आलेल्या बाउन्सरमुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  हे बाउन्सर तातडीने हटविले जावेत अशी मागणी समाजभुषण पुरस्कार प्राप्त साहित्यक शंकर तडाखे यांनी केली.           रिपब्लिकन फेडरेशन आँफ इंडियाच्या वतिने आयोजित कार्यक्रमा प्रसंगी तडाखे बोलत होते. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचिव माऊली सोनवणे प्रदेश उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय हौशी मुष्टीयुध्द महासंघाचे सचिव डाँ. मदन कोठुळे संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष फिरोज खान डाँक्टर अभिजीत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. जिवनावश्यक वस्तुचे वाटप, वृक्षारोपण, कवि सम्मेलन व विविध क्षेत्रात उल्लेखनी य कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष तडाखे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या वेळी दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी राष्ट्रपति पदक प्राप्त पोलिस कर्मचारी प्रदिप उर्फ बापु जांभळे, रेल्वे पोलिस उपनिरिक्षक कमलेश स्वामी, गुन्हे शाखा पोलिस कर्मचारी राजु मचे महिला पोलिस कर्मचारी मनीषा पुकाळे, राष्ट्रीय पंच मुष्ठीयुध्द मनोहर तातवाडकर, आंतरराष्ट्रीय खेळाडु महेंद्र बाजारे, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त कैलास गायकवाड, मुनावर खान, राजीव कुलकर्णी, पत्रकार किशोर मनतोडे, मिलिंद कांबळे, क्रिडा संघटक निलेश ठक्कर, आंतरराष्ट्रीय पंच राजु थापा, सामाजिक कार्यकर्ते रोहित दत्ता विजय चौहान आदींचा सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन या वेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष फिरोज खान यांनी केले होते.              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *