डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली).
Pckhabar- भारतात 30 जानेवारीला केरळ राज्यात तर महाराष्ट्रात 9 मार्चला पुणे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. आज भारतात 8 लाखापेक्षा तर महाराष्ट्रात त2 लाखापेक्षा अधिक रुग्ण क्वारंटाइन सहित अन्य उपचार घेत आहेत. हे प्रमाण भारताच्या एकूण रुग्णसंख्येच्या 20.96 टक्के आहे.
भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण77.32टक्के तर महाराष्ट्रात 71.03टक्के आहे. भारताचा रुग्ण मृत्यू दर 1. 71टक्के तर महाराष्ट्रा चा 2.93टक्के आहे. भारतात 18 ते 44 वर्षे वयोगटातील 44 टक्के तर 60 वर्षे वायवरील 51 टक्के जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 73 टक्के जेष्ठ नागरिकांमध्ये एका पेक्षा जास्त अन्य आजार होते.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात पसरू लागला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील लोकांनी त्यापासून दूर राहण्यासाठी, आपल्या बचावासाठी काय करावे? कोणती काळजी घ्यावी? यासाठी थोडक्यात मार्गदर्शन.
रोगप्रतिबंधक उपाय हा आजार होऊन तो बरा करण्यापेक्षा नक्कीच चांगला असतो
prevention is better than cure
रोगप्रतिबंधक उपाय नेहमीच महत्त्वाचे असतात. त्यांचे महत्त्व अबाधित आहे.
•वारंवार गरम पाणी प्यावे.
•सर्दी, खोकला होणार नाही याची काळजी घ्या.
•सर्दी झाल्यास वा सर्दी बरोबर खोकला, ताप असल्यास त्रिभुवन कीर्ती रसाच्या वा संशमनी वटी च्या 2-2 गोळ्या कोमट पाणी वा मधाबरोबर घ्याव्या.
•सर्दी, ताप, खोकला असेल तर अमृतरिष्ट 2-2-2 घ्यावे.
•सर्दी बरोबरच श्वास घेण्यास त्रास असल्यास सितोपलादी चूर्ण वा ज्येष्ठमध चूर्ण 2ते 3 ग्राम दिवसातून2/3 वेळा घ्यावे.
•चहात आल्याचा तुकडा, तुलसी ची 2-4पाने, 1-3 मिरे,1-2 लवंगा, थोडी दालचिनी टाकून तो चांगला उकलावा व नंतर प्यावा. साखरे ऐवजी गूळ वापरणे चांगले. गवती चहा उपलब्ध असल्यास त्याचा उपयोग करावा.
•दिवसातून 2-3 वेळा तरी असा चहा प्या. दूध आवडीनुसार.
•मधुमेह असणार्यांनी चहात दालचिनी अवश्य वापरावी. याने साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते, असा चहा आठवडा भर घेतल्यानंतर 2/3 दिवस घेऊ नका. नंतर असेच करीत रहा.
•दररोज रात्री दुधात हळद घालून गरम दूध प्यावे.
•नाकावर व नाकात निलगिरी तेल किंवा तुपाचे 2-3 थेंब लावावेत.
•जेवणानंतर गरम पाणी प्यावे
•गरम पाण्याने अंघोळ करा, अंघोळ करताना छाती, तोंड गरम पाण्याने चांगले धुवा.
•घश्यात काही त्रास होत असल्यास त्रिफळा चूर्णाने वा मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.
• मांसाहार करू शकता
•दररोज सकाळी संध्याकाळी चांगली अगरबत्ती तसेच धूप वा धूप कांडी लावा
•पपई, द्राक्षे, चिकू, डाळिंब ही फळे अधिक खा.
• आहारात हिंग,दालचिनी इ. मसाल्यांच्या पदार्थांचा वापर नेहमीं पेक्षा थोडासा अधिक करावा.
• शेंगदाणे व गूळ किंवा गूळ खोबरे खावे. याने रक्तातील हिमोग्लोबीन चे प्रमाण वाढते, परिणामी शरीरात प्राणवायू (ऑक्सिजन) चे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते. पूर्वी पाहुणा वा पाहुणे घरी आल्यानंतर शेंगा व गूळ खायला धायचे, गुळाचा चहा धायचे या मागे हेच कारण होते. त्यांचा चालून आल्यानंतरचा थकवा, श्रम दूर होऊन उत्साह वाटावा. चणे, फुटाणे खावेत. हे शक्तीदायक आहेत.(आठवा घोड्याचे मुख्य खाद्य कोणते आहे ते?.)
•सध्या सर्व प्रकारचा भाजीपाला उपलब्ध आहे. आहारात पालेभाज्या घ्या. पालेभाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी
•भाजीपाल्याचे एकच महत्व, स्वस्तात मिळेल भरपूर सत्व. शेवग्याच्या शेंगा खाव्यात.
•शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग, लोणी, तुपावानी,सत्व तिच्या संग.
•ज्यांना शक्य आहे त्यांनी च्यवनप्राश सकाळी व संध्याकाळी 1-1 चमचा घ्यावा.
•दररोज प्राणायाम करावा. याने मन प्रसन्न होते, फुफ्फुसांची क्रिया सुधारते, ते कार्यक्षम राहते.
•शिंकताना, खोकताना रुमाल समोर धरा. रुमाल दररोज बदला.
•हात वारंवार साबण किंवा तुरटीच्या साबणाने धुवा.
•मास्कचा वापर करा.
•बाहेरून आल्यानंतर कपडे धुवा किंवा एका बाजूला काढून ठेवा व पुन्हा बाहेर जाताना ते कपडे वापरा.
•बाहेरून आल्यावर अंघोळ करा. गरम पाण्याने चेहरा धुवा.
•नियमित कोणता ना व्यायाम करा.
•शेतात काम करा म्हणजे आपोआप व्यायाम होईल.
•रात्री शांतपणे 7 ते 8तास झोप घ्या.
•छाती गच्च वा छातीत कफ झाला आहे असे वाटत असेल तर गरम तव्यात कॉटनचा कपडा गरम करून थोडी छाती शेका.
•मधुमेह, रक्तदाब, दमा, मूत्रपिंडाचे आजार, कॅन्सर इ.आजार असल्यास विशेष काळजी घ्यावी. त्यांनी वेळेवर औषधे घ्यावीत.
शक्यतो पुढील गोष्टीं टाळा
•कोल्ड ड्रिंक्स पिणे.
•फास्ट फूड, चायनीज पदार्थ, मॅगी इ.
•वारंवार बाहेर जाणे. जाण्याचा प्रसंग आल्यास दोन माणसात कमीत कमी 1 मीटर वा शक्य असल्यास 2 मीटर (तीन ते सव्वा तीन वा 6 फूट) अंतर अवश्य ठेवा. शक्यतो गर्दीत जाऊ नका वा गर्दी करून गप्पा मारत बसू नका.
•चेहर्यासा साठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर या काळात तरी करू नये.
•अफवांवर विश्वास ठेवू नका.
•टी. व्ही. वरच्या बातम्या केंव्हातरी दिवसातून एकदा पहा.
•शक्यतो सॅनिटायझरचा वापर करणे टाळा वा फार कमी करा .
•यातील चहा, हल्दीयुक्त दूध इ.सारख्या गोष्टी विषाणू नाशक (Antiviral) जिवाणू नाशक( Anti bacterial,)आहेत तर हल्दीयुक्त दूध,भाजीपाला, शेंगदाणे, गूळ, झोप इ. रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे (immuno booster)आहेत.
•भारतात सध्या साधारणतः 100 चाचण्यामागे 7 ते 9 चाचण्या सकारात्मक येतात. म्हणजेच 7 ते9 रुग्ण मिळाले तरी त्यातील बरेचसे रुग्ण असे असतात की, त्यांच्यात एक ही लक्षण नसते म्हणून घाबरू नका.
•प्रत्येक सर्दी, शिंक म्हणजे कोरोना नव्हे, हे लक्षात ठेवा.
आपली सर्दी, शिंक सामान्यतः कशाची असू शकेल,हे पुढील प्रमाणे पडताळून पहा
1)कोरडा खोकला+शिंका=हवेतील बदल
2)खोकला+कफ+शिंका+नाक वाहणे+चोदणे=सामान्य सर्दी
3)खोकला+नाक वाहणे+कफ+शिंका+अंगदुखी+अशक्तपणा+साधारण ताप=फ्लू
4)सुखा खोकला+शिंका+अंगदुखी+अशक्तपणा+श्वास घेण्यास अडथळा+बर्यापैकी ताप=कोरोनाची शक्यता असू शकते. त्वरीत डॉक्टरचा सल्ला घ्या.
•घाबरू नका, काळजी घ्या
•सरकारी नियमांचे पालन करा
‘कोरोना व आयुर्वेदीक प्रतिबंधक उपाय’ : डॉ. अंकुश जाधव यांचा माहितीपूर्ण लेख

‘कोरोना व आयुर्वेदीक प्रतिबंधक उपाय’ : डॉ. अंकुश जाधव यांचा माहितीपूर्ण लेख









Leave a Reply